News 34 chandrapur
चंद्रपूर - पर्यावरण, पर्यटन मंत्री तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवासेना कडून दहावी परिक्षा मध्ये ९० टक्के मिळविणाऱ्या गरिब, गरजू अभ्यासू २० विद्यार्थ्यांना निट/जेईई व १२ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग मोफत देण्यात येणार आहे. Free neetआपल्या नवनवीन कल्पकतेने विद्यार्थी युवकांसाठी योजना व कार्यक्रम आयोजित करण्यात सदैव समोर असणारे युवासेनेचे प्रा निलेश बेलखेडे यांनी यावर्षी हि युवासेनेचे प्रमुख आदित्य जी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब, गरजू हुशार विद्यार्थ्यांचे डाॅक्टर, इंजिनिअर बनण्याची इच्छा असणाऱ्या तसेच स्पर्धा परिक्षेत मेहनत करून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक हाथ मदतीचा म्हणून त्यांच्या स्वप्नाची पुर्तता करण्यात मदत करण्याकरिता युवासेनेने हा उपक्रम घेतला असून यापुर्वी हि असेच अनेक विद्यार्थ्यांच्या हिताय उपक्रम युवासेनेचे च्या वतीने घेण्यात आलेले आहेत. Free jee
बरेच गरिब हुशार विद्यार्थी क्लासेस ची फि भरण्याकरीता पैश्याच्या अभावी आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही, तसेच बरेच पालकही इच्छा असूनही सुद्धा हतबल होऊन आपल्या पाल्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाही त्यामुळे अश्या विद्यार्थी व पालकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रा.निलेश बेलखेडे यांनी पुढाकार घेतला असून काही शिक्षण क्षेत्रातील समाजसेवी च्या मदतीने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. गरिबीमुळे एखाद्या हुशार पण आर्थिक रित्या दुर्लब विद्यार्थ्यांना मदत व्हावी त्याकरीता सदैव प्रयत्नशील राहून यापुढे हि चंद्रपूर च्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी मदतीकरीता युवासेना सदैव सोबत राहील असे प्रतिपादन यावेळी प्रा निलेश बेलखेडे यांनी केले .दहावी परिक्षेचा निकाल लागल्यानंतर गरजूं विद्यार्थ्यांनी मदतीकरीता ९५०३४४८८०२, ८८०५००७७०० या क्रमांकावर संपर्क करावे असे युवासेने च्या वतीने आव्हान करण्यात आलेले आहे.