News 34 chandrapur
चंद्रपूर : महाराष्ट्र तसेच प्रामुख्याने विदर्भात गाजत असलेला कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज घोटाळा ल्यातील संचालक, कार्यालयीन विदर्भ प्रमुखावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी दिलीप वळसे पाटील गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य यांना मुंबई इथे मंत्रालयात भेटून निमेश मानकर, तसेच कलकाम एजंट, गुंतवणुकदार यांनी केली.
गृहमंत्री पाटील यांनी सदर प्रकरणात स्पेशल स्क्वाड नेमून चौकशी करावी असे निर्देश पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना दिले. विष्णु पांडुरंग दळवी राहणार सावंतवाडी, कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा चेअरमन असून (कार्यालय वाशी,नवी मुंबई) विजय सुपेकर सीनियर डेव्हलपमेंट ऑफिसर, सुनील वांढरे, सीनियर डेव्हलपमेंट ऑफिसर ,अनिल पासवान आणि मोहम्मद इब्रिस, मुंबई युनिट हेड म्हणून कार्यरत होते. Financial fraud त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यानी 2013 पासुन कलकाम ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची सुरुवात महाराष्ट्रात केली. कंपनीने विदर्भात प्रमुख्याने चंद्रपूर, नागपुर, गडचिरोली, गडचांदूर, ब्रम्हपूरी, मूल, गोंडपिंपरी, यवतमाल, पांढरकवडा, घाटंजी, बुटीबोरी. इत्यादी ठिकाणी ऑफीस उघडले. तसेच विदर्भात कार्यालयीन कामाकरीता विदर्भ प्रमुख म्हणुन विदेश रामटेके रा. बियाणी नगर, तुकूम, चंद्रपूर तसेच विजय येरगुडे रा. चव्हाण कॉलनी, तुकूम, चंद्रपूर यांची नियुक्ती केली. विदर्भाची संपूर्ण जबाबदारी(आर्थिक देवाण-घेवाण) सदर दोन्ही व्यक्तीकडे होती. त्यांनी विदर्भात एजंट नेमणूक करून कंपनीबद्दल खोटी माहिती सांगितली. कंपनी 16 विविध क्षेत्रात काम करीत असून, कंपनीचा व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेशी आहे. एजंटनी ग्राहकांना कंपनीत पैसे Invest (Money /Fix Deposit) करण्यास सांगीतले तर त्या मोबदल्यात नक्कीच चांगलं इन्कम मिळून,दाम दुप्पट होईल असे आश्वासन दिले. Investment
वरील अमिषाला बळी पडून एजंट,ग्राहकांनी कंपनीत स्वतः पैशाची गुंतवणूक केली. विदर्भात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात अंदाजे 200 पेक्षा जास्त एजंट कंपनीशी जुळले आणि विदर्भ प्रमुख विदेश रामटेके, विजय येरगुडे यांच्या मार्गदर्शनात काम करण्यास सुरुवात केली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक गुंतवणुकधारकांनी अंदाजे (४०ते ५०) करोडो रुपयाची गुंतवणुक कंपनीत केलीली असुन दोन्ही व्यक्तीने चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक लेवल वर बनावट कंपनी कलावती आणि तनिष्का स्थापित केली असून गुंतवणूकदारांचा पैसा यात गुंतवला. financial crime
मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होऊन दोन वर्ष लोटून (2019) सुध्दा कपंनीने अजुनही एजंट, गुंतवणुकधारकांचा पैशाचा परतावा केलेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कंपनीचा आर्थिक व्यवहार बंद आहे. असे एजंट लोकांना सांगण्यात येत आहे. गुंतवणुकदार एजंट कडे येऊन त्यांच्या गुंतवणुक केलेल्या पैशाची मागणी करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एजंट लोकांनी याबाबत विदेश रामटेके आणि विजय येरगुडे यांना विचारणा केली असता कंपनीचे प्रमुख विष्णू दळवी आणि त्यांचे सहकार्य कडे बोट दाखविले. एजंट, गुंतवणूकधारकांची फसवणूक Investors fraud झाली आह असे लक्षात येतात त्यांनी याबाबत शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर यांची भेट घेतली त्यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून विविध नेत्यांना भेटून मागील एक दोन महिन्यापासून या संदर्भात सखोल चौकशी सुरू झाली असून एजंट, ग्राहकांचे बयान नोंदविणे सुरू आहे.काही जागी आरोपी विरोधात चंद्रपूर, यवतमाळ इथे FIR नोंदविण्यात आला आहे.पोलिसांनी विदेश रामटेके ला अटक केलेली असून विजय येरगुडे अजूनही फरार आहे .कंपनीचे एमडी विष्णू दळवी, कंपनीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यावर कठोर कार्यवाही करून एजंट, गुंतवणूकधारकांचा गुंतवणुक केलेला पैसा परत मिळावा अशी मागणी त्यांनी गृहमंत्री यांना केली.