News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व तेलंगणा राज्यातील नागरिकांना सिकलसेल या आजारावर उपचार सोयीचा व्हावा यासाठी वर्ष 2013 मध्ये माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर मध्ये सिकलसेल रिसर्च सेंटर्स व्हावे यासाठी केंद्रातून मंजुरी मिळवली.वर्ष 2019 ला चंद्रपुरात रिसर्च सेंटरचे भूमिपूजन करण्यात आले, वर्ष 2020 ला इमारतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
मात्र आता ह्या सिकलसेल इमारतीचे उदघाटन येणाऱ्या दिवसात पार पडणार असून यावर मोठं वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या पाठपुराव्याने सिकलसेल रिसर्च सेंटर आज पूर्णत्वास आले आहे.
काही दिवसांपूर्वी अहिर यांनी रिसर्च सेंटरची पाहणी करीत लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते उदघाटन करण्याची हमी दिली.
अहिर यांनी पाहणी केल्यावर चंद्रपूर कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी सुद्धा सिकलसेल रिसर्च सेंटरची पाहणी करीत 1 महिन्यात उदघाटन करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया आज माध्यमांसमोर दिली.
नवनिर्मित सिकलसेल रिसर्च सेंटरच्या इमारतीच्या उदघाटनावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.