News 34 chandrapur
चंद्रपूर - आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्षा श्रीमती एडवोकेट सुनीताताई पाटील यांच्याकडे नागभीड तालुक्यातील अकापूर येथून काही शेतकऱ्यांची शेत जमीन बेकायदेशीरपणे फेरफार केल्याची तक्रार आली होती त्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांना आदिवासी समाजातील गोरगरीब शेतकऱ्यांना ज्यांची शेती बेकायदेशीरपणे हडप केलेली आहे.
अशा व्यक्ती तथा अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तथा शेतकऱ्यांचा जमीनी परत मिळवुन द्यावे. अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आलेली आहे. Aam Aadmi Party
20 दिवसात यासंदर्भात करवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी आदिवासी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारेल. असे आव्हान करण्यात आले.
यावेळेला AAP चे जिल्हा अध्यक्ष सुनील देवराव मुसळे, शहर सचिव राजू भाऊ कुडे, जिल्हा सचिव संतोष दोरखंडे, महिला उपाध्यक्ष जस्मीन शेख, महिला सचिव आरती आगलावे, वंदना गवळी इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.