News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - यावर्षीच्या खरीप हंगामातील धान व कापसाच्या पेरण्या जवळपास पूर्ण आटोपत आल्या असून पेरण्या होऊन आठ ते दहा दिवसाचा कालावधी लोटला तरी देखील पाऊसाचा पत्ताच नाही. त्यामुळे पेरण्या केलेले खालचे दाणे वापले पण वर असलेले दाणे अजूनही पाऊसाअभावी कोंब सुद्धा उगवले नाही त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.
पाऊसाळ्याचे रोहिणी व मृग नक्षत्र संपलेला असून शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या सुकण्याच्या मार्गावर आहेत. केवळ तुरळक स्वरूपाचा पाऊस पडल्याने हंगामाला उशीर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. आता पाऊसच येत नसल्याने शेतकऱ्यांवर दुपार पेरणी करण्याचे संकट येणार म्हणून शेतकरी बांधव पाऊसाच्या व नुकतेच राज्य शासनाने विधानसभेत जाहीर केलेल्या कर्ज माफी योजनेतील नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन भत्याची प्रतीक्षा आहे. केंद्र शासनाच्या हवामान खात्याने २२ जुनपासून चांगला पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवुन जिल्ह्यातल्या बहुतांश भागातील शेतकऱ्यांनी २० जुनपासून खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस पडला नाही. त्यामुळे पेरलेले बियाणे उगवले खरे. परंतु आता पाण्याअभावी हे पिके सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उगवलेले पिके वाचविण्यासाठी आता जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

जिल्हयाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. त्यामुळे जिल्हयाची अर्थव्यवस्था ही शेतीवरच अवलंबून आहे. हजारो हेक्टर क्षेत्र हे लागवडीखाली आहे. त्यापैकी खरीप पिकाखालील अधिक क्षेत्र आहे. दरवर्षी सर्वसाधारण १५ ते २० जून दरम्यान खरीपाच्या पेरणीला सुरुवात होत असते. यावर्षी पाऊस लवकर येणार म्हणून शेतकऱ्यांनी जुनं महीन्याच्या प्रारंभापासून पेरणीची पुर्व तयारी करून ठेवली होती. हवामान खात्याने २२ जूननंतर मोठ्या प्रमाणात पाऊस येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे जवळपास २० जुनपासून जिल्ह्यात धान व कापूस पेरणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची टोकण पध्दतीने देखील लागवड केली आहे. जुनमधे काही भागात अधुनमधुन पाऊस पडला मात्र मुल सावली तालुक्यात पाऊसाचा पत्ताच दिसत नाही. तेव्हापासून बहुतांश भागात पाऊस आला नाही. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
१९ ते २८ जुन पर्यंत पेरणी केलेले बियाणे तासी लागले आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याने बियाणे पाहीजे त्या प्रमाणात उगवले नाही. काही शेतात ओल कमी असल्याने सदर बियाणे अजुनपर्यंत उगवले नसल्याची प्रत्यक्ष शेतात पाहणी केल्यावर कळली. त्यामुळे लवकर पाऊस न आल्यास या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.शेतात बियाणे उगवलेल्या पिकावर मोठा परिणाम पडत असल्याचे दिसून येते. दुबार पेरणीचे वेळ आली तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्यासाठी बियाणे नाही. बियाणे घेण्यासाठी पैसेही नाही. तेव्हा ज्या शेतकऱ्यांनी १८-१९/ १९-२०/२०२१ या वर्षातील पीक कर्ज नियमित भरणा केले त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने विधान भवनातून जाहीर केलेल्या प्रोत्साहन भत्याची रक्कम जुलै महिन्याच्या १ तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असे जाहीर केल्याने प्रोत्साहन भत्याची रक्कम आपल्या खात्यात कधी पडणार या प्रतीक्षेत शेतकरी आहे.