News 34 chandrapur
चंद्रपूर/पुणे - चंद्रपूरच्या लावण्याने पुण्यातील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत 5 किलोमीटर अंतर 19 मिनिटे 52 सेकंदात पूर्ण करीत प्रथम क्रमांक पटकाविला. Marathon 2022आपलं पुणे मॅरेथॉन 2022 स्पर्धेत चंद्रपूर ची लावण्या नागरकर सहभागी झाली होती, या स्पर्धेत 3 km, 5km, 10km, 21km व 42.2km च्या मॅरेथॉन मध्ये Under12 मध्ये 5 km मॅरेथॉन वर्गवारीत लावण्या नागरकर ने सहभाग घेतला.
सदर स्पर्धेत राज्यातून तब्बल 564 मुलींनी हजेरी लावली होती, मात्र लावण्याने 5km चं अंतर केवळ 19 मिनिटे 53 सेकंदात गाठत मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
लावण्याने आपल्या यशाचे श्रेय आपली टिम D-दशरथ आणि कोच दर्शन मासिरकर, विजय भगत, प्रकाश नागरकर यांना दिले.