News 34 chandrapur
घुग्घुस - शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देत विवाहित तरुणाने तिच्यावर नागपुरात अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.घुग्घुस पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
घुग्घुस शहरातील अल्पवयीन मुलीला नागपूर निवासी 24 वर्षीय आदित्य उर्फ विक्की शर्मा याने वारंवार लग्नाचे आमिष दिले.
मागील महिन्यात अल्पवयीन मुलीला नागपुरात बोलाविले व नागपूर फिरण्याच्या बहाण्याने तिच्यावर आपण लग्न करू असे म्हणत अत्याचार केला, मात्र त्या तरुणाने तिच्याबरोबर लग्न केले नाही. Minor girl raped
मात्र तो तरुण आधीच विवाहित होता, त्याला 2 मुले सुद्धा आहे, ही माहिती त्या अल्पवयीन मुलीला कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली, त्या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवीत अत्याचार केला. Atrocities
त्यामुळे त्या पीडितेने घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, 25 जून ला घुग्घुस पोलिसांना तक्रार प्राप्त होताच सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी आरोपी आदित्य च्या मोबाईल ची लोकेशन ट्रॅक केली व त्याला नागपुरातून अटक केली.
पोलिसांनी आरोपीवर कलम 376, पोस्को व एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि मेघा गोखरे करीत आहे.