News 34 chandrapur
राजुरा - तालुक्यातील पाचगाव जवळील कोडापेगुडा मध्ये शेतात काम करीत असताना पती-पत्नीच्या अंगावर अचानक वीज कोसळली, या घटनेत पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
30 जूनला जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने दुपारपासून विजेचा गडगडाट सुरू होता, पाऊसाची चाहूल लागल्याने काही शेतकरी शेतात काम करण्यासाठी गेले होते. Lightning
30 वर्षीय मानकु रामू कोडापे व 26 वर्षीय जंगुबाई कोडापे हे दाम्पत्य शेतात काम करीत होते, मात्र विजेचा कडकडाट झाल्याने कोडापे दाम्पत्यावर अचानकपणे वीज कोसळली.
या घटनेत मानकु कोडापे चा जागीच मृत्यू झाला तर पत्नी जंगुबाई गंभीर जखमी झाली.
जंगुबाई ला तात्काळ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, सदर घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Lightning strikes farmer couple