News 34 chandrapur
चंद्रपूर : उंचावर पीओपी करताना तोल गेल्याने पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास रामनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली. दिलीप रामटेके (३०) रा. सुगत विहारजवळ अंचलेश्वर वार्ड क्रमांक २ असे मृतकाचे नाव आहे.
POP Work
दिलीप हा खासगी कंत्राटदाराकडे पीओपीच्या कामाला नेहमी जात होता. दरम्यान, मंगळवारी नेहमीप्रमाणे काम करीत असताना सिडीवरून तोल जाऊन खाली पडला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. दिलीप हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. तो अविवाहित होता. पीओपीचे काम करून तो स्वत:सह वडील आणि बहिणेचे उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर डोंगर कोसळला. दरम्यान, काही नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूवर संशय व्यक्त करीत चौकशीची मागणी केली. गुरुवारी अंचलेश्वर वॉर्डातील नागरिक मोठ्या संख्येने रामनगर पोलीस ठाण्यात गोळा झाले. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
