चंद्रपूर/Tadoba - 30 मे ला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर असतांना भानुसखिंडीत संरक्षित वन क्षेत्राला आग लागल्याचे निदर्शनास आले. Tadoba jungle camp
वन अधिकारी व कर्मचारी वेळेवर त्याजागी पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले, मात्र त्या आगीत तब्बल 24 हेक्टर जंगल जळाले.
सदर आग कुणी लावली याचा तपास वन कर्मचाऱ्यांनी सुरू केला असता मौजा वायगाव भोयर येथील 58 वर्षीय किसन सदाशिव जांभुळे यांनी त्यांच्या अतिक्रमित केलेल्या क्षेत्रात धुरे जाळण्याकरिता आग लावली होती मात्र उन्हाळ्यायाचे दिवस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. Tadoba
सदर आरोपी जांभुळे यांनी हेतुपुरस्सर जंगलाला आग लावीत वन व वन्यजीवांचे आश्रय स्थान नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आरोपी यांचेवर वनगुन्हा नोंदवीत अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे वनविभागाने आरोपी जांभुळे यांना 22 मार्च ला पत्राद्वारे धुरे जाळत असताना वनविभागातील कर्मचाऱ्यांना कळवावे असे कळविले होते मात्र आरोपीने धुरे जाळत असताना वनविभागाला याबाबत सूचना दिली नाही. Tadoba andhari tiger reserved
सदर घटनेची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, एस.एम. ननावरे, व्ही.डी. कामटकर, पी.आर.कोसुरकर यांनी केली.
