चंद्रपूर - प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करी सध्या जिल्ह्यात जोमात आहे, मात्र सध्या कच्चा माल बोलावीत तंबाखू माफिया स्वतः भेसळयुक्त सुगंधित तंबाखू बनवीत नागरिकांच्या शरीरात कॅन्सर देण्याचं काम करीत आहे. Cancer factory
2 वर्षांपूर्वी रामनगर पोलिसांनी चीचपल्ली येथे सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड मारली होती, त्यानंतर तंबाखू तस्कर वसीम यांच्या MIDC स्थित गोदामावर धाड मारीत भेसळयुक्त सुगंधित तंबाखू पकडला होता. Mouth cancer
मात्र आता पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने तळोधी बाळापूर येथील वलनी स्थित फार्महाऊस वर धाड मारीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर धाड मारीत तब्बल 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत 8 आरोपींना अटक केली आहे.
जिल्ह्यातील तळोधी बाळापूर मधील मौजा वलनी स्थित सचिन वैध यांच्या फार्म हाऊसवर मशिनद्वारे मजा, ईगल व हुक्का बनविण्याचे काम सुरू होते. Oral cancer
ते मशिनद्वारे भेसळ करीत त्याची विक्री करीत त्या ठिकाणांहून इतरत्र पाठविण्याचे काम ही चालू होते.
गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्वतः कर्मचाऱ्यांना सोबत त्या कारखान्यावर धाड मारली.
आरोपीनी कशाप्रकारे सुगंधित तंबाखू भेसळ करतात त्याचे प्रात्यक्षिक ही दाखविले. Prohibited aromatic tobacco
घटनास्थळी हुक्का, शिशा, मजा ईगल व सुगंधित खुला तंबाखू 990 किलो 800 ग्राम, सुगंधित तंबाखू भेसळ करणाऱ्या मशीन, कच्च्या व पक्का मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन क्रमांक MH06BM4172, गुन्ह्यात वापरलेले एकूण 8 मोबाईल फोन असा एकूण 25 लाख 71 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Tobacco adulteration
आरोपींमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे राहणारे 27 वर्षीय सलमान आरिफभाई कासमानी, खंडाळा, साकोली, जिल्हा भंडारा येथील 23 वर्षीय सागर तेजराम सतिमेश्राम, ब्रह्मपुरी येथील 22 वर्षीय रोहित माणिक धारणे, 24 वर्षीय वैभव प्रभाकर करकाडे, साकोली भंडारा येथील 24 वर्षीय सागर संजय गजभिये, आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील 22 वर्षीय वैभव भास्कर भोयर, साकोली भंडारा येथील 27 वर्षीय मयूर सुरेश चाचरे व आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील 20 वर्षीय खेमराज विलास चटारे यांचा समावेश आहे. lcb chandrapur
मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या सुगंधित तंबाखूची भेसळ व विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आरोपींवर कलम 328, 420, 468, 472, 272, 273, 188 अन्न व सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 59 प्रमाणे तळोधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाई मुळे सुगंधित तंबाखू माफिया तस्करांचे धाबे दणाणले असून आता पोलिसांची नजर चंद्रपुरातील तंबाखू माफियांवर आहे.
सदर यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि संदीप कापडे, पोउपनी अतुल कावळे, राजेंद्र खनके, संजय आतकुलवार, सुरेंद्र महंतो, गणेश मोहूर्ले, संतोष येलपुलवार, संजय वाढई, गोपीनाथ नरोटे, गणेश भोयर, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, दीपक डोंगरे, कुंदनसिंग बावरी, प्रमोद डंबारे व शेखर आसुटकर यांनी केली.

