News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी, कांग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व युवा नेते राहुलजी गांधी,राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली कांग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचा जाहीर झाल्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील संघटन बळकट करण्यासाठी DRO म्हणून बिहारचे श्री.संजय पासवान यांची नियुक्ती केल्याने आज मुल येथे येथील सभेत कार्यकर्त्यांनी कांग्रेसचि विचारधारा आपल्या निर्वाचन क्षेत्रात प्रत्येक घरात पोहचवून कांग्रेसचे संघटन मजबूत करावे असे आव्हान चंद्रपूर जिल्ह्याचे DRO संजय पासवान यांनी शेकडो कार्यकर्त्यांसमोर केले.
कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मुल तालुक्यात आजही ग्राम पंचायत व सहकार क्षेत्रात कांग्रेस पुढे आहे. जिल्हा बँकेनी मिळालेल्या नफ्यातून स्व. राजीव गांधी स्वावलंबन योजना राबवून अनेक युवकांना कामाला लावले आहे. कॅन्सरग्रस्त यांना उपचारासाठी आर्थिक मदत करुन जीवनदान देण्याचे काम केले आहे.
करिता ग्राम पंचायत सरपंच, सदस्य आणि सहकार सोसायटीच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सुद्धा आपल्या सोबत ग्रामीण पुरुष व महिला यांचे कामे करण्यात स्वतःला वाहून घेतले पाहिजे तरच विरोधकांवर आपण मात करु शकतो असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी कांग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनीही संघटन बांधणी करतांना बूथ नुसार काम करणाऱ्या व्यक्तीला प्राधान्य द्यावे असे सांगितले. Congress news
तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने आलेल्या DRO संजय पासवान,BRO अमर पाटील चालबोर्डीकर, शहर तेजराज बोधे,ग्रामीण निखिल देठे, जितेंद्रसिंह कोणगारेकर, यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी घनश्याम मूलचंदानी,दशरथ वाकुडकर,गुरुदास चौधरी, किशोर घडसे, मंगला आत्राम यांनीही कांग्रेसच्या ध्येय धोरण प्रशिक्षण घेण्याबाबत विचार व्यक्त केले. याप्रसंगी पोंभुरना अध्यक्ष कवडू कुंदावार, बल्लारपूर ग्रामीण अध्यक्ष विनोद बुटले, शहर अध्यक्ष करीमभाई, आदी उपस्थित होते.
बैठकीचे आयोजन तालुका अध्यक्ष घनश्याम येनूरकर, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,युवक अध्यक्ष पवन निलमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गॅंगरेड्डीवार, सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार, पुरुषोत्तम भुरसे, महिला अध्यक्ष रुपाली संतोषवार, नगरसेवक विनोद कामडी,ललिता फुलझेले, तालुक्यातील कांग्रेसचे सर्व सरपंच, सहकारी सोसायटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य,व असंख्य ग्रामीण कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक घनश्याम येनूरकर यांनी केले तर संचालन गुरु गुरनुले यांनी केले.

