News 34 chandrapur
चंद्रपूर - मागील 6 महिन्यापासून रिक्त असलेल्या महिला कांग्रेसच्या नव्या शिलेदारांची अखेर मे महिन्याच्या शेवटी नियुक्ती झाली.चंद्रपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी नम्रता ठेमस्कर तर शहर जिल्हाध्यक्ष पदी माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली.
पद मिळाल्यानंतर कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त महिला कांग्रेसतर्फे शीतपेय व फ्रुटी वाटपाचा कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात घेण्यात आला. Nana patole birthday
पण सदर कार्यक्रम सकाळी 10 वाजता महिला कांग्रेसच्या शहर अध्यक्ष संगीता अमृतकर यांचा, त्यांनी महिला पदाधिकारी यांच्यासमवेत जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात शितपेयाचे वाटप केले.
शहर अध्यक्ष यांचा कार्यक्रम आटोपताच ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी रुग्णालय परिसरात फ्रुटी चे वाटप केले.
विशेष म्हणजे दोन्ही कार्यक्रम वेगळे व पदाधिकारी सुद्धा वेगळे, शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त कार्यक्रम टाळला. Congress news
चंद्रपूर कांग्रेस पक्षात अंतर्गत वाद हा जुना विषय राहिला आहे, कांग्रेस पक्षातील गटबाजी कधी संपणार नाही, आता या निमित्ताने महिला कांग्रेसमध्ये गटबाजीची धुसफूस सुरू झाली आहे.
चंद्रपूर महिला कांग्रेसच्या आधीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संघटन वाढीसाठी काही योगदान दिले नाही, मात्र जुन्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करीत कांग्रेसने पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहे.
आता नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटन मजबूत करावे असा कांग्रेस पक्षाचा मानस होता मात्र आजच्या कार्यक्रमाने शहर व ग्रामीण पदाधिकारीचं वेगळे आहे असे चित्र दिसू लागले.
