News 34 chandrapur
गडचांदुर - गडचांदूर शहरातील भालेराव व घुले कुटुंब काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. Burglary gang arrested
मात्र जेव्हा दोन्ही कुटुंब गावी परतले असता भालेराव यांच्या घरातील सामान अस्तव्यस्त परिस्थितीत आढळले, त्यांनी घराची चौकशी केली असता घरातील LED TV, CCTV CAMERA DVR, Esar laptop, Hp Laptop, 2 सोन्याच्या अंगुठ्या असा एकूण 69 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी घराचा ताला तोडून चोरी केला.
गडचांदूर पोलिसांनी सदर प्रकरणी तपास केला असता आरोपी गडचांदूर वार्ड क्रमांक 6 मध्ये राहणारा 26 वर्षीय मैनुद्दीन मन्सूर आलेख जीलानी, माणिकगड सिमेंट कंपनीच्या क्वार्टर मध्ये राहणारा 25 वर्षीय निवास अशोक रॉय, 23 वर्षीय गजेंद्र उर्फ गज्या बालाप्रसाद ढगे, 19 वर्षीय पियुष अरुण सोनटक्के यांना अटक करण्यात आली.
सदर अटकेतील आरोपिकडून चोरी गेलेल्या मालापैकी 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Burglary
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात सपोनि प्रमोद शिंदे, धर्मराज मुंडे, हेमंत धवणे, इंदल राठोड, विजय कोटनाके, तिरुपती माने, संदीप थेरे यांनी पार पाडली. Crime news
