News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील सरदार पटेल मेमोरिअल सोसायटीच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था चालविण्यात येतात. या संस्थेचे अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. असे असताना देखील जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना या संस्थेत कार्यकारणी सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा ठराव संस्थेने घेतलेला आहे, त्यास पदाधिकारी विनोद दत्तात्रय यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी आज 15 जून रोजी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली.
Press conference
त्यांनी सांगितले की, कोरोना च्या काळात २०२१ मधे कडक टाळेबंदी असताना तत्कालीन अध्यक्ष शाफिक अहमद यांनी संस्थेच्या घटनेचे उल्लंघन करीत बैठक बोलवून नवीन सदस्यांना भरती केले. लगेच १५ दिवसांत त्यांनी नवनियुक्त सदस्य विजय आईचवार यांना अध्यक्ष पद बहाल केले.
सहा महिन्यांच्या आत नविन सदस्यांना मतदान करता येत नसताना देखील आईचवार पिता पुत्र दोहोंनी स्वतःलाच मतदान करून पदे बळकावली . संस्थेच्या या सभेवर टाळेबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी FIR देखील दाखल झाला होता. अश्या सर्व वादग्रस्त घटनाक्रमाचा पुढला अध्याय म्हणून आता जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सदस्य म्हणून समाविष्ट केले आहे. यात श्री वडेट्टीवार यांना विनाकारण गोवुन त्यांच्या राजकीय प्रतिमेला तडा देण्याचा प्रकार आईंचवार यांनी केला आहे, असा आरोप विनोद दत्तात्रेय यांनी केला आहे.
Rajiv gandhi engineering colleges chandrapur
मागील अनेक वर्षांपासून या संस्थेद्वारे संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत नाही. दरम्यान गडचिरोली येथे उभारलेले एक अभियांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थी संख्येअभावी बंद करावे लागले.
Chandrapur local news
न्यायव्यवस्थेवर प्रभाव प्रभाव टाकण्यासाठी व प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी हा दुरुपयोग तर नाही अशीही शंका येत आहे. कर्मचारी व संस्थेचे सदस्य हे शासनाच्या विविध विभागाकडे न्यायासाठी मागणी करीत असतात तेव्हा शासनाच्या विविध यंत्रणांवर मंत्र्यांच्या नावाचा वापर करून प्रभाव टाकण्याच्या हेतूने ही निवड केली आहे असा आरोप विनोद दत्तात्रेय यांनी केला आहे.
