News 34 chandrapur
चिमूर/शंकरपूर - शंकरपूर येथे 36 वर्षीय युवकाने दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली.
पीडित मुलीच्या आजोबा यांचे शंकरपूर येथे दारुभट्टी समोर नाश्त्याचे दुकान आहे, दुकानाला लागणारा माल हा घरूनच पाठविल्या जात होता.
मुलीच्या आईने चिमुकलीच्या हाती अंडे देत दुकानात न्यायला सांगितले होते, मुलगी आजोबा यांचेकडे गेली असता आरोपी 36 वर्षीय राजीक उर्फ काल्या हा दारू पीत होता. what is pocso act
काल्याची नजर त्या चिमुकलीवर पडली, चिमुकली घरी जात असताना तुला घरी सोडतो असे सांगत गाडीवर बसवीत राजीव गांधी महाविद्यालयाच्या मागे निर्जन स्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला.
सदर प्रकार चिमुकलीने आपल्या आईला सांगितला असता, आईने मुलीला सोबत घेत पोलीस स्टेशनमध्ये जायला निघाली.
त्यावेळी आरोपी काल्या वाटेत दिसल्याने मुलीच्या आईने त्याला चांगलेच बदडून काढले, मात्र काल्या तिथून निसटून पळाला.
पीडितेच्या आईने याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी तात्काळ नराधम काल्या याला अटक केली.
पोलिसांनी पोक्सो व 376 कलम अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला, पुढील तपास सपोनि विनोद जांभळे व कर्मचारी करीत आहे.