News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 25 जून हा काळा दिवस म्हणून पाळला गेला. Black day of indiaयाच दिवशी म्हणजेच 25 जून 1975 ला देशात आणिबाणी लागू करण्यात आली होती याच घटनेचा निषेध भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे करण्यात आला. Emergency in the country यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की सत्तेसाठी भारतीय लोकशाही ची हत्या करून असंख्य निरपराध लोकांना अटक करण्यात आली व संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण करण्यात आली त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो तसेच Emergency1975HauntsIndia आणिबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या वीरांना अभिवादन करतो असे त्यांनी यावेळी सांगितले.
Assassination of Indian democracy
Assassination of Indian democracy
सदर कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री रवींद्र गुरनुले, माजी उपमहापौर राहुल पावडे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर, महामंत्री शिला चव्हाण, प्रज्ञा बोरगमवार, महानगर उपाध्यक्ष अरुण तीखे, मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, रवी लोणकर,विठ्ठल डुकरे,माजी नगरसेवक रवी आस्वाणी,प्रदीप कीरमे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेरकी, किसान मोर्चा अध्यक्ष रवी चहारे, अनु.जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,रामकुमार आक्कापेल्लीवार,राजेंद्र खांडेकर, अरविंद कोलणकर, महिला मोर्चा उपाध्यक्षा रेणुका घोडेस्वार, प्रभा गुळधे,मंजुश्री कासनगोट्टवार, सागर येळने,बंडू गौरकार,महेश कोलावार,नितीन करीया, शैलेश इंगोले, प्रलय सरकार,आकाश ठुसे, गणेश रामगुंडेवार, पवन माहुरकर,नूतन मेश्राम, वर्षा सोमलकर, रंजिता येले, बाळा चंदनखेडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.