News 34 chandrapur
चंद्रपूर – २०२०-२०२१ दरम्यान कोविड लॉकडावून नंतर चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणात पुन्हा वाढ होऊ लागली असल्याचे प्रदूषण मंडळांच्या जानेवारी ते मे २०२२ ह्या ५ महिन्याच्या आकडेवारी वरून स्पस्ट होते. जानेवारी ते मे ह्या १५१ दिवसात चंद्रपूर शहरात ४७ दिवस चांगले तर ९८ दिवस प्रदूषित होते.
तर शहरालगतच्या ओउद्योगिक क्षेत्रात उन्हाळ्यातील १५१ दिवसात चांगले दिवस केवळ ३३ तर ११५ दिवस प्रदूषित होते,चंद्रपूर शहरातील प्रदूषण समंधी रोग आणि मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता हे प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लानेट सोसायटी चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केले आहे. Air pollution
मागील २ वर्षे कोरोनामुळे औद्योगिक आणि नागरी प्रदूषण कमी झाले होते. आता पुन्हा सर्व व्यवहार सुरु झाल्यामुळे पुन्हा प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर,ताडाळी, घुग्गुस आंनी बल्लारपूर हे ४ ओद्योगिक क्षेत्र हे गेल्या १२ वर्षापासून सतत अतिप्रदूषित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अनेक कृती आराखडे आखले गेले तरी प्रदुषनात संथगतीने सुधारणा होत आहे. आजही चंद्रपूरचा सेपि स्कोर (CEPI) हा ७४.४१ असून तो महाराष्ट्रांत २ ऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील उद्योग हे त्यांचे प्रदूषण मापन करतात, म प्र.नि मंडळ आणि के.प्र.नि.मंडळ स्वतंत्रपणे प्रदूषण मापन करतात. चंद्रपूर शहरात आणि खुटाळा ओद्योगिक क्षेत्रात सतत हवा प्रदूषण मापन यंत्रना लावलेली आहे.हवा गुणवत्ता निर्देशांक करताना कमीतकमी ३ आणि जास्तीत जास्त ६ प्रदूषकांचा समावेश होतो.
चंद्रपूर शहराचे मागील ५ महिन्याचे प्रदूषण निर्देशांक (AQI) खालील प्रमाणे.
शहरातील नोंद झालेल्या प्रदूषण मापन केंद्राच्या २०२२ च्या आकडेवारी नुसार
* जानेवारी महिन्यात चांगले दिवस १३ असून प्रदूषित दिवस १८ ( त्यात अति प्रदूषित २ दिवस ) होते.
* फेब्रुवारी महिन्यात चांगले दिवस १३ तर प्रदूषित दिवस १५
* मार्च महिन्यात चांगले दिवस ६ तर प्रदूषित दिवस २५
* एप्रिल महिन्यात ८ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित होते.
* मे महिन्यात ७ दिवस चांगले तर २३ दिवस प्रदूषित होते.
मागील ५ महिन्यातीत एकूण १५१ दिवसात ४७ दिवस चांगले आरोग्यदायी तर ९८ दिवस प्रदूशीत होते. उर्वरित दिवस आकडेवारी उपलब्ध नाही.
औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे नोंदणी झालेले प्रदूषनाच्या आकडेवारीनुसार
* जानेवारी महिन्यात १० दिवस चांगले तर २१ दिवस प्रदूषित ( अतिप्रदूषित ३ दिवस )
* फेब्रुवारी महिन्यात २८ पैकी २७ दिवस प्रदूषित
* मार्च महिन्यात ३१ पैकी ३० दिवस प्रदूषित
* एप्रिल महिन्यात १३ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित (अतिप्रदूषित ३ दिवस )
* मे महिन्यात १० दिवस चांगले तर २० दिवस प्रदूषित
५ दिवसाचे निरीक्षण उपलब्ध नाही-
खुटाळा परिसरातील मागील ५ महिन्यातील एकूण १५१ दिवसात ३३ दिवस चांगले तर ११३ दिवस प्रदूषित होते. उर्वरित दिवस आकडेवारी उपलब्ध नाही.
प्रदूषण कमी करण्यास उपाययोजना
चंद्रपूर शहरातील प्रदूषणात पेट्रोल, डीझेल ची वाहने, रस्त्यावरील धूळ ,कचरा ज्वलन, कोळसा ज्वलन, बांधकामे आणि काही प्रमाणात थर्मल पॉवर स्टेशन ची धूळ ह्यामुळे हे प्रदूषण वाढले आहे. Thermal power ह्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून प्रयत्न केले तर प्रदूषण कमी होऊ शकते. ह्यासाठी बँटरीवर चालणारी वाहने आणि सायकलचा वापर ,रस्ते सफाई मशीनचा वापर, रस्त्यावरील बांधकामे,रेती माती ला बंदी, शहरात कचरा व कोळसा न जाळने, थर्मल पॉवर स्टेशन च्या जुन्या सर्व संचात सुधारणा करणे. इ.उपाय योजना केल्यास हे प्रदूषण कमी होऊ शकेल असे ग्रीन प्लानेत सोसायटीचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यांनी सुचविले आहे.
