News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील प्रदूषणात भर टाकण्यासाठी वरोरा तालुक्यात BS इसपात नामक कंपनीची सुरुवात झाली, कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याने शिवसेनेने त्याविरुद्ध आंदोलन छेडले.कंपनीने स्थानिक बेरोजगारांना काम देण्यास नकार, शेतकऱ्यांनाया नुकसान भरपाई, पांदण रस्ते या सर्व बाबी टाळले. Shivsena news
याविरोधात शिवसेनेचे पदाधिकारी मनीष जेठाणी यांनी गावकऱ्यांसोबत मजरा-सालोरी येन्सा ब्लॉक येथे आंदोलन पुकारले.
मात्र त्यांचं आंदोलन व्यक्तिगत असल्याचा ठपका ठेवत बीएस कंपनी व्यवस्थापनाने जेठाणी विरोधात खोटी तक्रार दाखल करीत त्यांचे आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न केला.
यासंदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, मनीष जेठाणी व गावकरी यांच्यासमवेत उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली, कंपनीने गावकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या मात्र दुसऱ्या दिवशी बीएस कंपनीचे HR मनीष कातंगडे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख जीवतोडे व मनीष जेठाणी यांनी मारण्याची धमकी दिली याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली.
बीएस इसपात कम्पनी ही जाणूनबुजून शिवसेना पक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे काम करीत आहे, आता आम्ही पक्षाची बदनामी खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेचे मनीष जेठाणी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य हर्षद निब्रड यांची व HR व्यवस्थापक मनीष कातंगडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती मात्र ती व्हायरल होण्याआधी ती बातमी समाजमाध्यमांवर प्रकाशित झाली. व त्यामध्ये जेठाणी यांचा संबंध नसताना नाव गोवण्यात आले व तशी बातमी प्रसारित केली.
याबाबत मनीष जेठाणी यांनी मनीष कातंगडे, मनसेचे राजू कुकडे, मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाणे यांचेविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
कम्पनी गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करत नसताना आम्ही जनप्रतिनिधी म्हणून न्याय मागायचा का नाही असा प्रश्नही मनीष जेठाणी यांनी यावेळी उपस्थित केला, नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आम्ही कंपनी विरोधात लढा देऊ.
पत्रकार परिषदेत ऍड. अमोल बावणे, संदीप मेश्राम, सरपंच वंदना निब्रड, प्रतिभा मानकर उपस्थित होते.
