News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी चंद्रपूर महिला कांग्रेस मध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहे.
मागील 5 महिन्यापासून महिला कांग्रेस अध्यक्ष व महानगर अध्यक्ष हे पद रिक्त होते.
निवडणुकीपूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी नम्रता ठेमस्कर व चंद्रपूर महानगर अध्यक्ष पदी माजी महापौर संगीता अमृतकर यांची निवड करण्यात आली आहे. Mahila congress
नम्रता ठेमस्कर ह्या महिला कांग्रेसच्या राज्य सचिव आहे, त्यांना पद मिळाल्यावर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात महिला कांग्रेस मध्ये नवी भरारी देण्याचं काम केलं आहे. Congress news
त्यांच्या पक्ष वाढीसाठी सुरू असलेली मेहनत व कार्य बघता त्यांना ग्रामीण महिला अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
माजी महापौर संगीता अमृतकर ह्या सध्या राजकारणात सक्रिय झाल्यापासून त्यांनी विविध आंदोलने व मेळाव्यात आपला सहभाग दर्शविला आहे.
महिला कांग्रेसच्या नम्रता ठेमस्कर व संगीता अमृतकर यांना नवी जबाबदारी मिळाल्यावर जिल्ह्यात महिला कांग्रेसचे सक्षम संघटन निर्माण करून पक्षाला भरारी देण्याचं काम करू अशी ग्वाही दिली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
