चंद्रपूर - काही दिवसांपूर्वी कोसारा परिसरात ACC Cement Company च्या Not For Resale बॅग आढळून आल्या होत्या, याबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत सदर कम्पनी ठेकेदारावर कारवाई व्हावी याची मागणी केली होती.
मात्र 2 दिवसांनी त्या सिमेंट बॅग वर S RAJ असे लिहले असल्याचे आढळले होते, साईराज ही कंपनी राजू रेड्डी यांची असल्याची माहिती देत त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत संबंधितांची चौकशी करण्याची मागणी राजू कुकडे यांनी केली होती.
कुकडे यांच्या आरोपावर राजू रेड्डी यांनी प्रति उत्तर देत मनसेचे राजू कुकडे यांनी राजकीय सुपारी घेत माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहे.
राजू रेड्डी हे घुघुस कांग्रेसचे अध्यक्ष असून त्यांनी अनेक सामाजिक कार्य केले असून आजही ते नागरिकांच्या सेवेस सदैव हजर असतात.
कोसारा येथे सिमेंटच्या 18 पैकी 17 बॅग वर नाव S-Raj नाही फक्त एकाच बॅगेवर नाव कसे काय आले? असा प्रश्न उपस्थित केला, व एका बॅगवर असलेले नाव हे पेन ने लिहल्याचा दावा रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
Acc cement द्वारे कंत्राटदारांना ज्या बॅग दिल्या जाते त्यावर कंत्राटदाराचे नाव व कोड हा प्रिंट असतो, मात्र एका बॅगेवर हाताने नाव लिहल्याचा खोडसाळ पणा करून कुकडे यांनी घुघुस येथील काही राजकीय पक्षाद्वारे सुपारी घेत मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविला आहे ते आम्ही खपवून घेणार नाही अशी माहिती देत रेड्डी यांनी ह्या सर्व प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व रामनगर पोलिसात दिली असल्याचे सांगितले.
4 वर्षानंतर कुकडे व रेड्डी हे acc cement वरून पुन्हा आमनेसामने आले आहे, आता या प्रकरणी कुणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
