चंद्रपूर - नूतनीकरण झालेल्या बाबूपेठ स्मशान भूमीत चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडविली.
20 मे ला संतोष गरगेलवार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये बाबूपेठ येथील स्मशानभूमीत चोरी झाल्याची तक्रार नोंदवली.
स्मशानभूमीत असणाऱ्या गोदामातील दरवाज्याचा ताला तुटलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
पोलिसांनी फिर्यादीची तक्रार नोंदवीत प्रकरणाचा तपास सुरू केला असता गोदामातील 4 गॅस सिलेंडर चोरी झाल्याची बाब उघडकीस आली. Cemetery
पोलिसांनी तपासाला गती देत खबऱ्याना कामी लावले. Crime news
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 36 वर्षीय विशाल प्रकाश डोंगरे, 28 वर्षीय रवी उर्फ चक्या पेंढारकर व 30 वर्षीय अमोल ईश्वर दुर्गे तिघे ही रा. भिवापूर वार्ड यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला.
HP कंपनीचे 4 मग GAS cylinder व गुन्ह्यात वापरलेले दुचाकी वाहन असा एकूण 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विशेष म्हणजे चंद्रपूर मनपाने नुकतेच बाबूपेठ येथे गॅस सिलेंडर वर चालणारे शवदाह केंद्र सुरू केले आहे मात्र शवदाह केंद्राजवळ असलेल्या गोदामाला एकही चौकीदार नेमला नसल्याने सध्या ते शवदाह बेवारस अवस्थेत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि जयप्रकाश निर्मल, महेंद्र बेसरकर, विलास निकाडे, शरीफ शेख, जयंता चुणारकर, सचिन बोरकर, चेतन गजलवार आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
