भद्रावती - प्लॉट धारकाचा एका जमिनीशी काही संबंध नसताना त्यांनी अतिक्रमण करून राहत असलेल्या दलित कुटुंबाचं घर उध्वस्त केलं, इतकेच नव्हे तर त्या कुटुंबाने प्लॉट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले असता आधी त्यांची तक्रार नोंदविण्यास पोलीस तयार नव्हते त्यावेळी उपस्थित नागरिकांनी विनवणी केल्यावर भद्रावती पोलिसांनी प्लॉट धारकांवर अदखलपात्र गुन्हा नोंद केला.
भद्रावती तालुक्यातील सायवन या गावी ग्रीन टेरा नामक ले-आऊट आहे, त्याच्या बाजूला काही कुटुंब अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत आहे.
गोर-गरीब नागरिकांचे घर त्या ले-आऊट च्या गेट च्या बाजूला असून त्या घर ले-आऊट च्या समोरील जागेवर आहे व त्याच ठिकाणी पी.कुमार यांचा प्लॉट असून त्यांना जाण्यास त्रास होत असल्याने त्यांनी काही इसमाना सोबत घेऊन संजय पुरुषोत्तम अलोने यांचं घर पाडून टाकले.
इतकेच नव्हे तर त्या घरातील संपूर्ण वस्तू बाहेर फेकल्या गेली, पाळीव कोंबड्या सुद्धा पी.कुमार यांच्या सोबत आलेल्या इसमानी आपल्या सोबत नेल्या.
घरी कुणी नसताना पी.कुमार जाडाजी यांनी मुजोरी करीत दलित कुटुंबाचे घर उध्वस्त केले, यामध्ये त्या कुटुंबाचे 10 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाले.
सदर कुटुंब आता उघड्यावर पडले आहे.
दलित कुटुंबाचं घर पाडल्या प्रकरणी पी.कुमार यांचेवर अनुसूचित जात प्रतिबंधक कलमाद्वारे एट्रोसिटी चा गुन्हा दाखल व्हायला हवा होता मात्र पीडित गोर-गरीब असल्या कारणाने पी.कुमार यांचेवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
पीडित अलोने परिवाराने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आयोजित पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.
