News 34 chandrapur
जिवती - ग्रामीण भागाला जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात कांग्रेस सरकारच्या काळात सुरू झाले होते, आजही हे काम नियमितपणे सुरू आहे. Low quality roadमात्र ग्रामीण भागातील काम म्हटले तर निकृष्ठ पणा कामात येणारचं, पण जगात कुठे नसलेला निकृष्ठ दर्जाचं रस्त्याचं काम चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे होत आहे.
5.800 किलोमीटर रस्त्याचं काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असून या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ठ काम होत आहे.
तब्बल साडेचार कोटी रुपयांच्या वर निधी या रस्त्याच्या निर्माणकार्याला देण्यात आला मात्र सदर रस्त्याचं डांबर व गिट्टी हाताने निघत असून याबाबत नागरिकांनी प्रशासनाला निवेदन दिले मात्र यावर कुणीही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही.
अणे नागरिक सदर रस्त्याबाबत प्रशासनाला तक्रार देत आहे मात्र गावकऱ्यांच्या तक्रारींची प्रशासन दखल घ्यायलाच तयार नाही. Pradhan mantri gram sadak yojana
देशाचा पाया म्हणून ग्रामीण भागाला प्रथम प्राधान्य आहे, मात्र त्याच ग्रामीण भागात कंत्राटदार आपल्या मनमर्जीने असे निकृष्ठ काम करीत असेल तर त्याला जबाबदार कोण?
