News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - आत्मनिर्भर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने नुकताच गुजरातमध्ये ईफको द्वारे विकसित करण्यात आलेल्या पहिल्या नॅनो युरीया लिक्विड या रासायनिक खतांचा वापर करुन मुल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे असे आव्हान मुल येथील आदर्श शेतकी खरेदी विक्री समितीचे सभापती श्री.पुरुषोत्तम भुरसे यांनी केले आहे.Urea liquid चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना अतिशय कमी भावात व अल्पदरात रासायनिक खते, बियाणे, पिकांवरील रोगावर नियंत्रण आणणारे औषध पुरविण्यात आदर्श शेतकी खरेदी विक्री समिती मर्यादित मुल च्या संचालक मंडळाने केंद्र असो राज्य शासनाच्या वतीने विकसित केलेल्या खतांचा, बियाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने करुन शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम समिती करीत आहे. News for farmer
इफकोने नॅनो युरिया,नॅनो डीएपी, नॅनो लिक्विड स्वरूपात वापरावेत याबाबत नुकतेच आणलाईन झूम अपद्वारे घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून सहकारी सोसायटीच्या प्रतिनिधींना आव्हान केले आहे. याचा फायदा लहानंतल्या लहान शेतकऱ्यांना होईल अशी भूमिका शासनाची आहे. करिता मुल तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी यावर्षीचे उत्पन्न घेतांना अधिकाधिक नॅनो युरिया लिक्विड चा वापर करून आपल्या उत्पादनात वाढ करुन घ्यावी असे आव्हान आदर्श शेतकी खरेदी विक्री समितीच्या संचालक मंडळाच्या वतीने समितिचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, उपसभापती विनोद गाजेवार, व्यवस्थापक संदीप आलेवार यांनी केले आहे.
