बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातला एक विचित्र अपघात सीसीटीव्हीत चित्रीत झालाय. मुख्य मार्गावर भरधाव वेगातील एका कारने दुचाकीस्वाराला ओलांडून दुभाजकावर धडकली. Deadly overtake अगदी थोडक्यात बचावलेला युवक काही घडलेच नाही असे भासवत भरधाव वेगात पुढे गेला. तर दुभाजकावर धडकल्याने वाहतूक खांब कोसळून कार उलटली.
दुसऱ्या क्षणाला उलटलेली कार देखील उलटून पुन्हा सरळ होत मार्गावर स्थिरावली.एवढा भीषण अपघात होऊनही आत बसलेल्यांना कुठलीही इजा झाली नसल्याचे दृश्यातून उघड झाले आहे. अत्यंत भीषण अपघात होऊनही कोणालाही खरचटले देखील नाही. ही कार यवतमाळच्या एका व्यापा-याची असल्याची माहिती पुढे आली आहे. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती ही म्हण या घटनेने सार्थ केली आहे.