गडचिरोली / दिनांक २८ मे रोजी, संध्याकाळी ७ च्या सुमारास आलापल्ली विभागातील ग्रामपंचायत नागेपल्ली येथील ITI जवळील ६३ किव्हो रोहित्रमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. व त्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. अशा वेळी रोहियरा दुरुस्ती साठी वेळ लागला असता व्ही ग्राहकांना अंधारात राहावे लागले असते.
त्यामुळे लवकरात लवकर विजपुरवठा सुरु करून ग्राहकांना दिलासा देण्यास लगेचच नवीन रोहित्र उपलब्ध आहे ते तपासन्यात आले. सुदैवाने रोहित्र उपलब्ध झाले. आता ५८५ किलोचे अवजड रोहित्र अंधाऱ्या रात्री बसविणे तेवढेच जिकरीचे, उपकार्यकारी अभियंता श्री प्रविण तुरानकर व प्रभारी सहाय्यक अभियंता श्री प्रदीप बोरकर यांनी तातडीने निर्णय घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांची जुळवाजुळव करून तसेच Hydra क्रेन ची जुळवाजूलाव करून काम सुरू केले.
रात्रीच्या अंधारात टॉर्च (विजेरी )च्या प्रकशात बंद पडलेले रोहित्र बदलवुन विद्युत पुरवठाअंदाजे १०:३० वाजता सुरळीत केला.msedcl
त्यामुळे १५० ग्राहकांना दिलासा मिळाला व उकाड्यापासून व अंधारापासून त्यांचा बचाव झाला. व त्यांनी महावितरणचे आभार मानले. यावेळी विज वितरण आलापल्ली कार्यालयाचे कर्मचारी श्री भिमटे,श्री कन्नाके,श्री नंदेकर,श्री मद्दर्लावर,श्री घोरपडे, श्री कोसनकर यांनी परिश्रम केले. सदर काम कार्यकारी अभियंता श्री सुधीर हेडाऊ यांच्या मार्गदर्शनात व श्री अति कार्यकारी अभियंता प्रभाकर मेश्राम यांनी तातडीने रोहित्र उपलब्ध करून दिल्यामुळे शक्य झाले.
