News 34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजे बाबूपेठ या प्रभागात 90 टक्के नागरिक नझुल च्या जागेवर राहत आहे.तब्बल 30 ते 40 वर्षांपासून नागरिक नझुल वर राहत असून अजूनही शासनातर्फे नागरिकांना जागेचा पट्टा मिळाला नाही.
बाबूपेठ येथील हिंग्लज भवानी मंदिर परिसराजवळ राजेश धकाते मागील 25 वर्षांपासून राहत आहे, काही वर्षापूर्वी मुख्तार कुरेशी यांनी बाजूच्या जागेवर कब्जा करीत धकाते यांना त्रास देणे सुरू केले.
धकाते यांच्या संडास बाथरूम चे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे त्यांनी पुन्हा बांधकाम केले, कुरेशी यांनी चंद्रपूर मनपात धकाते यांच्या शौचालय-बांधकामाचा विरोध करीत तक्रार नोंदवली.
पालिकेने धकाते यांच्या नावाने नोटीस जारी करत बांधकामाची परवानगी ची प्रत मागितली, मात्र पालिकेचे अधिकारी नियम विसरले, नझुल च्या जागेवर बांधकाम करण्यासाठी परवानगी ची गरज नसताना त्यांना कागदपत्रे सादर करायला सांगितली.
याबाबत धकाते यांनी पालिकेत जात अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आपबिती सांगितली.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोक्का चौकशी केल्यावर निर्णय घेऊ असे सांगितले, मात्र पालिकेने बांधकामाबाबत पाडण्यासंदर्भात कोणतीही पूर्वसूचना न देता 27 मे ला सरळ जेसीबी ने धकाते यांचे शौचालय व काही बांधकाम जमीनदोस्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिथे घर तिथे शौचालय ही मोहीम राबविली मात्र चंद्रपूर मनपाचे अधिकारी नागरिकांचे शौचालय पाडत पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेला ठेंगा दाखवीत आहे.
याबाबत धकाते यांनी मनसेला मदतीची हाक दिली, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकरण समजून घेत सोमवारी याबाबत आयुक्तांना जाब विचारू अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली.
याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सम्पर्क होऊ शकला नाही.
विशेष म्हणजे नझुल च्या जागेवरील अतिक्रमण काढण्याचे काम हे तहसीलदार अंतर्गत येते, असे अनेक चंद्रपूर मनपा हद्दीतील प्रकरणे तहीसलदार यांचेकडे गेलेली आहे.

