News 34 Chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल येथील नागपूर रोडवरील चामोर्शी नाक्याजवळ वेंकटेश्वरा कार्पोरेशन राईस मिल व धानाचे मोठे गोडाऊन आहे. गोडाऊनचे छप्पर पूर्ण लोखंडी टीनच्या शेडचे आहे.
गोडाऊन मध्ये हजारो पोते धान भरले असून काल दिनांक १७/५/२०२२ रोजी मध्यरात्री अचानक वादळी स्वरूपात जोरदार हवा आल्यामुळे धानाच्या गोडाऊनचे वरील लोखंडी इंगलच्या कैच्या बाक्सबिंम तुटल्याने त्यावर असलेले solar system panal सोलर सिस्टीम पॅनलसह अस्तव्यस्त खाली पडल्याने गोडाऊनमध्ये असलेले हजारोंच्यावर धानाचे पोते संपूर्ण फटून उच्च प्रतीच्या धानाचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये व्यंकटेश्वरा कार्पोरेशन राईस मिल rice mill कंपनी मालकाचे अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
