News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील जनतेच्या विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे व रामसेवक मोरे यांच्या नेतृत्वात 13 मे रोजी नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी यातील बहुतेक मागण्यांची पूर्तता येत्या 10 दिवसात करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते.त्याप्रमाणे बरेचशया मागण्या पूर्ण करण्यात आल्या.परंतू थकबाकी मालमत्ता व पाणीपट्टी करावर लावण्यात असलेला 2 टक्के दंड (शास्ती)रद्द करण्यात आला नाही.
Bjp hunger strike
Bjp hunger strike
तसेच पंतप्रधान आवास योजनेची उर्वरित रक्कम लाभार्थांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली नाही.सदर दोन्ही म्हत्वाच्या मागण्या अजूनही पूर्ण झाली नसल्याने शेवटी 18 मे रोजी नगरपरिषदे समोर ठिय्या आंदोलन तर 19 मे रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे. जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतला जाणार नाही,असा निर्धार उपोषणकर्ते प्रशांत खाडे व बबलू रासेकर यांनी सदर प्रतिनिधीपुढे व्यक्त केला आहे.सदर ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषणाला भाजपच्या सर्व महिला, पुरूष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे विनंतीपुर्वक आवाहन भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार,नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे यांनी केले आहे. Property tax
