News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
महात्मा ज्योतीराव फुले,शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आदर्श समाज निर्मिती सोबतच देशाच्या ऐक्यासाठी प्रेरणादायी असून त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रत्येकांनी त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे असे मौलिक विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जि.के.उपरे यांनी व्यक्त केले.ते कोरपना तालुक्यातील आवारपूर येथे बुध्द जयंती आणि सिध्दार्थ बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
लोकार्पण व उदघाटन आमदार सुभाष धोटे यांनी केले.तर एम.टी. साव,संघा साव,कवीता मडावी, यशवंत वाडे, चेतन उंदिरवाडे,चंद्रमणी धोटे, सत्यवान दिवे, बिबीचे माजी उपसरपंच प्रा.आशिष देरकर, अभय मुनोत, राहूल बोढे,हारून सिद्दिकी यांच्यासह इतरांची प्रमुखाने उपस्थिती होती.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि विहारांच्या माध्यमातून सदैव स्मरणात राहो, त्यांनी दाखविलेल्या मार्गाने जाण्याची ऊर्जा प्राप्त होवो,या उद्देशाने मी या क्षेत्राचा आमदार असल्याने मदत करत राहील अशी ग्वाही आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी दिली.आवारपूर तसेच परिसरातील बौद्ध कुटुंबाच्या वर्गणीतून भव्यदिव्य असे बुद्ध विहार आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ही बाब प्रशंसनीय असल्याचे गौरव उदगार उपस्थित मान्यवरांनी केले.पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ वानखेडे यांनी तसेच आवारपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी गौतम धोटे, दर्शन बदरे,रमेश खाडे, प्रमोद चांदेकर यांनी अथक परिश्रम घेतले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे,सचिव दर्शन बदरे,आई रमाई मंडळातर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.शिला धोटे,चेतना खाडे, लताबाई वानखेडे,धम्मबाई जिवने,शुद्धलेखा खाडे, शितल ठमके,सविता बदरे यांनी मोठ्या उत्साहात आमदार सुभाष धोटे यांचे स्वागत केले. सायंकाळी भोजन दानानंतर गायीका प्रमोदिनी साठे वर्धा यांचा सामाजिक भीम,बुद्ध गीत,प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला.या दोन्ही कार्यक्रमाला स्थानिक व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्यासंख्येने उपस्थिती दर्शवली होती. आम्रपाली महिला मंडळ,आई रमाई महिला मंडळाच्या महिला आणि समस्त बौध्द बांधवांचे बुद्ध जयंती व बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे संचलन डंभारेताई, प्रास्ताविक धोटेताई तर आभार केशव वानखेडे यांनी व्यक्त केले.
