News 34 chandrapur
घुग्गुस : शहरा लगत असलेल्या नकोडा गावात 29 एप्रिल रोजी इंडेन गॅसच्या स्फोटात सोडोनी आसाम व अनिता आसम या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली असून सदर घटनेची परत पुनरावृत्ती होवू नये याकरिता 14 मे रोजी काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिषटमंडळाने शहरातील देवनील इंडेन गॅस एजेंसी, तसेच एच .पी. गॅस एजन्सीला भेट देवून गॅस सिलेंडरची पाहणी केली व निवेनाद्वारे घुग्गूस - नकोडा शहरातील व गावातील प्रत्येक घरातील गॅस शेगडी, टुयुब रेगुलेटर याची तपासणी प्रत्येक दोन वर्षात एकदा आवश्यक आहे.
Indane gas agency
याकरिता तातडीने सदर तपासणी करण्यात यावी सध्या शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून गॅस अपघाताने मोठी वित्त व जीवहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. HP Gas
करिता कडक उपाययोजना व अंमलबजावणी करावी व नागरिकांनी ही आपल्या कुटुंबा जीव रक्षणा करिता गॅस एजन्सी तर्फे करण्यात येणाऱ्या तपासणीला सहकार्य करावे अशी विनंती केली.
शिष्टमंडळात कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार,इर्शाद कुरेशी,सुकमार गुंडेटी, अनुप भंडारी, रोहित डाकुर, रफिक कुरैशी, सुनील पाटील,प्रदीप आसेकर,अंकुश सपाटे, बालकीशन कुळसंगे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
