News 34 chandrapur
चंद्रपूर - देशाच्या राजकारणाची दिशा ठरविण्याचं काम हे ग्रामीण भागातील जनता करीत असते, मात्र त्या भागातील समस्या स्थानिक जनप्रतिनिधी ही सोडवायला असमर्थ ठरतो.चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यात स्थित नांदगाव, हेटी नांदगाव व टोले नांदगाव या गावात पाण्याची समस्या 20 वर्षानंतर ही जैसे थे चं आहे.
गावात काही ठिकाणी हाताने वाळू उपसा करीत हाताने खोल खड्डा करीत पाण्याची व्यवस्था जनतेला करावी लागत आहे.
सकमुर प्रादेशिक पाणी पुरवठा योजने अंतर्गत नळाद्वारे सात गावातील नागरिकांना घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. मात्र सबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणामुळे कधी दूषित पाणी पुरवठा होतो. तर कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाणी बंद असते. अशा वेळेस येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी लगतच्या नाल्यातील पाणी (चुहा) उपसा करुन आणावे लागते आहे.
सदर गावातील पाणी समस्येचा बातम्या अनेक वृत्तपत्र, व डिजिटल मीडियाने पुढे आणल्यावरही त्याचा काही उपयोग झाला नाही, मात्र देशातील सर्वात मोठी वृत्तसंस्था ANI त्या गावी जात स्पेशल रिपोर्ट तयार करीत बातमी पुढे आणली व दुसऱ्याच दिवशी ती बातमीही प्रकाशित झाली. Department of Water Resources
आणि त्याचं दिवशी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बातमीची दखल घेत गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव हेटी गावाची पाणी समस्येची पूर्ण माहिती जाणून घेत आम्ही त्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करू असे सांगितले.
तब्बल हजार किलोमीटर दूर बसलेल्या मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील समस्या दिसली मात्र जिल्ह्यातील पालकमंत्री, खासदार, आमदार व प्रशासन यांनी साधी दखलही घेतली नाही. ANI NEWS
काय म्हणावं जनप्रतिनिधी यांच्या या कारभाराला, स्थानिक जनप्रतिनिधी म्हणून निवडून यायचं व नंतर मतदार संघातील समस्यांना बगल देत विसरून द्यायचं.
राज्यात फक्त चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या उमेदवाराला हरवून कांग्रेस पक्षातर्फे बाळू धानोरकर खासदार म्हणून निवडून आले होते.
निवडून आल्यावर माझ्या पगारातून मी शेतकऱ्यांचा विमा काढणार असे सांगितले होते मात्र त्यांनी अजूनही विमा काढलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर केली नाही. water problem
खासदार धानोरकर हे सध्या कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात मात्र नागरिकांच्या मूलभूत समस्या खासदार कधी सोडविणार हा मोठा प्रश्न आहे.
गोंडपीपरी तालुका हा कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे यांचा मतदार संघ आहे, त्यांचं ही या समस्येकडे दुर्लक्ष आहे, गावातील नागरिकांना त्यांच्या या समस्येची जाणीव आमदाराला आहे की नाही विचारले असता त्यांनी सरळ सांगितले की कितीदा त्यांना सांगायचं? आम्ही सांगून थकलो आहे पण समस्या काही मिटली नाही.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी कांग्रेसच्या मंत्र्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील समस्या दिसली मात्र स्थानिक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले.
