News 34 chandrapur
माजरी - माजरी येथील वर्धा नदी घाटात मासे पकडण्याकरिता गेलेल्या दोघांना जलसमाधी च्या घटनेने माजरी शहर हादरून गेले.
दुःखाची बाब म्हणजे मृत्युमुखी पडलेल्यात 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे.
खोल पाण्याचा अंदाज न समजल्याने 42 वर्षीय अशोक रामपाल यादव व 8 वर्षीय रोहित राहुल मलय्या दोघेही नदीत बुडाले.
उपस्थित तिघांनी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते यशस्वी ठरले नाही.
दोघेही एकता नगर येथे राहणारे होते, पोलिसांना माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी लगेच रेस्क्यू टीम ला पाचारण केले असता 2 वाजता अशोक यादव व सायंकाळी 6.30 वाजता रोहित चा मृतदेह मिळाला.
पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेले.
पुढील तपास माजरी पोलीस स्टेशनचे सपोनि विनीत घागे करीत आहे.
