चंद्रपूर/चीचपल्ली - चंद्रपूर-मूल मार्गावरील चीचपल्ली जवळ दोन ट्रक चा भीषण अपघात झाल्याने दोन्ही वाहनाला आग लागली असून मूल-चंद्रपूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. Terrible accident
रात्री 10.30 वाजता दोन ट्रक चा भीषण अपघात झाला, यामध्ये 1 ट्रक हा डीझल ने भरलेला टँकर तर दुसऱ्या ट्रक मध्ये लाकडे भरलेली होती त्यामुळे आगीने भीषण भडका घेतला.
आगीने भीषण रूप धारण केल्याने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे खोळंबली.
Huge fire
या अपघातात वाहन चालकांचे काय झालं याबाबत अद्यापही माहिती मिळाली नसून घटनेच्या 1 तासानंतर अग्निशमन विभाग चीचपल्ली पोहचला, मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले नाही. सदर आग ही महामार्गावरील झाडांना सुद्धा लागत असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले.
विशेष म्हणजे अग्निशमन विभागाचा दूरध्वनी मागील आठवड्याभरापासून बंद अवस्थेत आहे.
