News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूरातील जनतेवर लादण्यात आलेल्या थकबाकी गृहकर व पाणीपट्टी करावर 2 टक्के दंड (व्याज)रद्द करावा तसेच पंतप्रधान आवास योजनेची उर्वरीत रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी,या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन 18 मे रोजी स्थानिक नगरपरिषदे समोर भाजपतर्फे एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Bjp Gadchandur मात्र याची स्थानिक नगरपरिषद शासन प्रशासनाने कसलीच दखल घेतली नाही.अखेर भाजप दलित आघाडी शहराध्यक्ष प्रशांत खाडे व शक्ती केंद्र प्रभारी बब्लू रासेकर यांनी 19 मे पासून नगरपरिषदे समोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.जोपर्यंत मागण्या पुर्ण होणार नाही,तोर्यंत उपोषण मागे घेणार नाही,अशी भूमिका यांनी घेतली आहे. Prime Minister's Housing Scheme

आगोदरच कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली,लॉकडाऊनमुळे व्यापार ठप्प पडले होते.या संकटावर मात करत आता कशीबशी गाडी रूळावर येत आहे.एका संकटातून सुटत असतानाच नगरपरिषदेच्या रूपात दुसरे संकट येऊन ठेपले आहे. यांनी घेतलेल्या गृहकर व पाणीपट्टी करावर 2 टक्के व्याज शहरवासीयांच्या जिव्हारी लागला असून सुरू असलेली व्याजासह वसूली त्वरित रद्द करावी. तसेच मागिल अंदाजे दोन वर्षांपासून रखडलेली पंतप्रधान आवास योजनेची शेवटची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी भाजपची असून जर यावर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर भविष्यात यापेक्षाही तीव्र व मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा नगरपरिषदेत भाजपचे विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे व गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांनी दिला आहे.
सदर दोन्ही मागण्या जनहिताच्या असल्याने पहिल्या दिवसापासूनच शहरातील नागरिकांनी उपोषण मंडपाला भेट देण्यास सुरुवात केल्याचे अनुभवायला मिळत आहे.यावेळी भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, नगरसेवक अरविंद डोहे,नगरसेवक रामसेवक मोरे, जेष्ठ नेते महेश शर्मा, निलेश ताजने, महादेव एकरे,रोहन काकडे,संदीप शेरकी सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच घरकुल लाभार्थी महिला व पुरूषांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. हल्लीच्या 46 सेल्सिअस डिग्री पेक्षा जास्त तापमानात उपोषणकर्त्यांची व्यथा लक्षात घेऊन आतातरी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना पाजर फुटणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.