News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - मुल पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा भादूरना येथील शेतमजूर खुशाल गोविंदा सोनूले वय (५४ ) हा दिनांक १५/५/२०२२ रोजी सकाळी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेला आणि तेंदूपत्ता संकलन करुन जंगलातुन गावाकडे परत येत असतांना सोमनाथ परिसरातील जंगलात फिरत असलेल्या वाघाने त्याच्यावर सकाळी १०-०० वाजताच्या सुमारास वाघाने हल्ला करुन त्याला ठार केले. Tiger attackएवढेच नाहीतर त्याच्या देहाचे छिन्न-विच्छिन्न तुकडे तुकडे करून इतरत्र टाकल्याचे दिसून आले. शनिवार रोजी ही घटना घडली असून गावातील खुशाल अजूनही का परत आला नाही. याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली. असता वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी काही गावकऱ्यांसोबत जंगलात जाऊन शोध घेतला असता रात्र झाली परंतु खुशालचा शोध काही लागला नाही. सकाळी परत वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगमकर, क्षेत्र सहाय्यक, पाकेवार, वनरक्षक वड्डे, पारडे, उईके, यांचे सोबत काही गावकरी जंगलात फिरुन शोध घेताना खुशालच्या मृतदेहाचे छिन्न विच्छिन्न अवस्थेत झालेले तुकडे सापडले. मृतक खुशाल सोनूले यांच्या मागे पत्नी,दोन मुले असा परिवार आहे. Wild animals
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस स्टेशन मुल यांना दिली असता पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांनी आपल्या सहकाऱ्याना घटनास्थळी पाठवून मोका चौकशी केली व मृतदेह मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविले. Tendupatta
याप्रसंगी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.आर. नायगमकर क्षेत्र सहाय्यक श्री. पाकेवार, तीन वनरक्षक यांचेसह माजी सरपंच संतोष रेगुंडवार, अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. जी.आर. नायगमकर यांनी मृतकांच्या नातेवाईकास तात्काळ २५,००० (पंचवीस हजार रुपये) आर्थिक मदत दिली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी हे आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने करीत आहेत तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. मागील पाच महिन्यांपूर्वी मौजा कोसंबी येथे शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना अजूनही ताजी आहे.
