News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे सर्वेसर्वा,देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्याबदल अभिनेत्री केतकी चितळे यांनी सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर पोस्ट करून अपमान केल्याबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आक्रमक झाल्याचे चित्र आहे. Ketaki chitale post
यामुळे शरद पवार यांचे चाहते व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून सर्वत्र संतापजनक नाराजीचा सुर उमटत आहे.केतकी चितळे या माथेफिरू अभिनेत्रीने भविष्यात अशा प्रकारे कृत्ये करू नये यासाठी तीचा (facebook page) फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम अकाउंट (instagram) कायमस्वरूपी ब्लॉक करावा, आमचे दैवत आदरणीय शरद पवार यांच्यावर अपमानजनक लिखीत पोस्ट केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेनुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा,अशी मागणी गडचांदूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
याविषयी गडचांदूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना राकाँचे राजूरा विधानसभा प्रमुख तथा माजी जि.प.सभापती अरूण निमजे,राकाँ जिल्हा महासचिव रफिक निजामी,राकाँ तालुकाध्यक्ष तथा न.प. उपाध्यक्ष शरद जोगी,राकाँ महिला आघाडी शहराध्यक्षा तथा नगरसेविका सौ.अश्विनी कांबळे, नगरसेविका मीनाक्षी एकरे,सुनील अरकीलवार, प्रविण मेश्राम,निलेश गोरे,करण सिंग सह राकाँचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
