News 34 chandrapur
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मास्टर सभा नंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उत्तर सभा पार पडली, त्या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.त्यांच्या सभेला ते म्हणत होते मास्टर सभा, पूर्ण भाषण ऐकल्यावर समजलं लाफ्टर सभा होती. काल संभाजी महाराज आणि भगवान नरसिंह यांची जयंती होती. आम्हाला वाटलं काही तेजस्वी आणि औजस्वी ऐकायला मिळले, पण लाफ्टर शो शेवटपर्यंत संपलाच नाही. Devendra fadnavis त्याच गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. 100 सभांची बाप सभा असे आमचे मित्र म्हणत होते. पण 100 कौरव होते, पांडव पाच होते, काल कौरवांची सभा झाल्याचं म्हणतही देवेंद्र फडणवीसांनी हल्लाबोल केला. Uttar sabha
फोटोग्राफी करून कोणाला वाघ होता येत नाही. उद्धवजी वाघाचे फोटो काढून कुणाला वाघ होता येत नाही. वाघ होण्यासाठी निधड्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. कुठला सामना केला तुम्ही सांगा, कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला नाही. सध्या देशात फक्त एकच वाघ आहे ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. Bjp maharashtra
दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. मैदानात कोण होतं, उद्धव ठाकरे होते पण फेसबुक लाईव्ह करत असल्याचा टोमणाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.
