News 34 chandrapur
वरोरा - राजकारणात पद मिळालं की राजकीय ताकदीचा वापर करीत अनेकजण त्या पदाचा फायदा घेतात, विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी काम न करता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवितात.
वर्षभराआधी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते हे वरोऱ्यात जुगार खेळताना रंगेहात अटकल्याने त्यांचं पद गेलं, त्यांच्या जागी नव्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मुकेश जीवतोडे यांना देण्यात आली मात्र आज एका प्रकरणात त्यांचं नाव उजेडात आलं आहे. Political news
आता सदर प्रकरणात त्यांचं पद जाणार काय? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
वरोरा तालुक्यातील B.S. Ispat या कंपणीत स्थानिक रोजगार द्यावा या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली होती, सदर कम्पनी विरोधात आंदोलने ही झाली मात्र नंतर सर्व आंदोलने ही स्वतःच्या लाभापायी घेण्यात आली असा ठपका कंपनीतील HR व्यवस्थापकाने ठेवला. Shivsena news
कंपनीतील व्यवस्थापक मनीष कातलांगे यांनी युवासेना पदाधिकारी मनीष जेठाणी विरोधात तक्रार देत स्थानिक राजकारणात खळबळ उडवून दिली होती.
त्यांनतर कम्पनी व शिवसेना यांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दिल्या.
सदर प्रकरण मिटावे यासाठी वरोरा उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख जीवतोडे, मनीष जेठाणी, गावकरी व कंपनी व्यवस्थापक मनीष कातलांगे यांची बैठक झाली.
कंपनीत 150 लोकांना टप्प्याने रोजगार देणार अशी हमी दिल्यावर बैठक संपली, मात्र बैठक पूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी कंपनी HR मनीष कातलांगे यांना मारण्याची धमकी दिली.
जीवतोडे यांच्या भीतीने कातलांगे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातच बसले.
विशेष म्हणजे जीवतोडे यांनी दिलेली धमकी चा साक्षीदार एक पोलीस कर्मचारी आहे.
मात्र मुकेश जीवतोडे यांनी सदर आरोप फेटाळून लावत असा प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले.
या सर्व प्रकाराची कातलांगे यांनी लिखीत स्वरूपात उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांचेकडे तक्रार दिली आहे.
बीएस इस्पात आणि शिवसेनेतील वाद सोडविण्यासाठी माजरा येथील गावकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या चर्चेत जेठाणी व जीवतोडे हेही सहभागी झाले. दीड तास चर्चा झाल्यानंतर झालेले निर्णय सर्वांना मान्य होते. परंतु दुसऱ्या दिवशी कंपनीच्या लोकांनी तक्रार दाखल केली.बैठकीच्या वेळी असा कोणताही प्रकार घडला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले नाही. त्यामुळे हे प्रकरण चौकशी ठेवले असून दोषी आढळल्यास कारवाई करू.
आयुष नोपाणी
एसडीपीओ,वरोरा.
वैयक्तिक लाभासाठी आंदोलने करीत नागरिकांचा विश्वासघात करण्याचे काम सत्ताधारी करीत आहे, ही मुजोरी आहे की सत्तेचा माज यावर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, शिवसेना आज सत्तेत असल्याने त्यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कारवाई करायला हवी.
शिवसेना पक्ष स्वतःच्या जिल्हाप्रमुख असलेल्या पदाधिकाऱ्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

