News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मूल : जिल्हा परीषदेच्या तत्कालीन अध्यक्षा, माळी महासंघाच्या महीला राज्य अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टीच्या मूल तालुकाध्यक्षा संध्याताई गुरनुले यांचे पती आणि फिस्कुटी ग्राम पंचायतीचे सरपंच नितीन गुरनुले यांचे वडील रूषेश्वर गुरनुले यांचे आज (२८/५/२०२२) सकाळी ६.३० वा. मूल येथील राहत्या घरी दिर्घ आजाराने निधन झाले.
स्व. रूषेश्वर गुरनुले येथील नवभारत विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक आणि माळी समाजाचे सेवाभावी कार्यकर्ते होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मूल, एक मुलगी, दोन स्नुषा, बहीण, जावई, नातवंड असा मोठा परीवार आहे. आज दुपारी २ वा. त्यांचेवर मूल येथील उमा नदी काठावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
