News 34 chandrapur
मुंबई - औरंगाबाद येथे अकरबुद्दीन ओवैसी यांच्या दौऱ्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
ओवैसी यांच्या दौऱ्यात त्यांनी औरंगजेबाच्या समाधीस्थळी दर्शन घेत हिंदूंच्या विरोधात गरळ ओकली, त्यांच्या भाषणावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी आक्षेप घेत तात्काळ ठाकरे सरकारने गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली. Akarbuddin owaisi
महाराष्ट्रात आमदार-खासदार यांनी हनुमान चालीसा पठण करायचं म्हटल्यावर त्यांच्यावर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करीत पोलीस कोठडीत रवानगी करायची मात्र ओवैसी वर भडकाऊ भाषण केल्यानंतरही ठाकरे सरकार कार्यवाही का करीत नाही?
असा संतप्त सवाल भाजप नेते मोहित कंबोज यांनी यावेळी उपस्थित केला, ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाली आहे.
भोंग्याच्या परवानगी वर 1 हजार मशिदीना भोंग्याची परवानगी मिळाली मात्र फक्त 25 मंदिरांनाचं भोंग्याची परवानगी देण्यात आली.
ओवैसीच्या भडकाऊ भाषणावर ठाकरे सरकार गप्प आहे, 15 मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला ठेवा आम्ही आमच्या पद्धतीने ओवैसी ला धडा शिकवू असं थेट आव्हान मोहित कंबोज यांनी सरकारला दिलं.
