News 34 chandrapur
मुल - (गुरु गुरनुले) देशातच चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांचे जीवन लाही-लाही झाले आहे. दुपारी १२ ते ४ पर्यंत घराच्या बाहेर पडणे कठीण झाले असून अती उष्णतेचा परिणाम मानवी जीवनावर अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतांना मुल तालुक्यातून वाहणारी उमा नदी कोरडी पडली आहे.नदीला जोडणारे नालेही कोरडे पडले आहेत.तलावही आटल्याचे दिसत आहे. मुल नगरातील व ग्रामीण भागातील पाणी पुरवठा यंत्रना कुचकामी ठरली आहे. अनेक गावतील विहिरीच्या पाण्याची पातळीही अतिशय खोलवर गेली आहे. त्यामुळे काही गावात भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. चिरोली येथे पाणी पुरवठा योजना असूनही नळाचे पाणी पिण्या योग्य नाही
तालुक्यातील चिरोली व हेटी येथील ९० टक्के नागरिक पीत आहेत विहिरीचे पाणी. चिरोली येथील पाणी पुरवठा योजना अंधारी नदीवर कार्यान्वित केली असून नदीच्या पात्रात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीमध्ये कित्येक दिवसापासून गाळ साचून आहे परंतु विहितील गाळ स्वच्छ करण्यात आलेला नाही. त्यामुळे नळाला गाळ युक्त पाणी येत असल्याने पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावात पाणी पुरवठा योजना असतांनाही गावातील ९० टक्के नागरिकांना विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे.त्यामुळे विहिरीचे पाणी बुडाला गेले आहे.,या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
नलेश्वर-खालवसपेठ गावचे नागरिक नळाच्या पाण्यापासून वंचित
तालुक्यातील मौजा नलेश्वर, खालवसपेठ गावासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंधारी नदीवर तयार करण्यात आली त्याच नदीवर बांधकाम विभागाने पूल-कम बंधारा बांधल्याने त्या बंधाऱ्यात नलेश्वर व खालवसपेठ गावाकडे नदीतून येणारे पाणी बंधाऱ्यातच अडवून ठेवल्याने दोन्ही गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत पाणीच नाही. जनावरांना सुद्धा पाणी पाजणे कठीण झाले आहे. म्हणून खालवसपेठ,नलेश्वर येथील नागरिक नळाच्या पिण्याच्या पाण्यापासून अजूनही वंचित आहेत.
भादूरणा येथील १४ लाखाची पाणी पुरवठा योजना बंद
तालुक्यातील मौजा भादूरणा येथे नागरिकांच्या पिण्याचे पाणी मिळावे म्हणून १४ लाख रुपये खर्चाचे दोन सोलरपम्प लावण्यात आले.परंतु दोन्ही सोलर पम्प अजूनही बंद अवस्थेत असल्याने दुरुस्तीकडे ग्राम पंचायतचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी भादूरणा वासीय जनतेला पायपीट करण्याची पाळी आली आहे.तरीदेखील ग्राम पंचायत पदाधिकारी यांचे दुर्लक्ष होत असून मुख्य पदाधिकारी आपल्या कामात व्यस्त आहेत तर इतर सदस्य बाहेरगावी गेल्याने आम्हा जनतेला कोण पाणी पाजनार अशी प्रतिक्रिया तहानलेल्या ग्रामस्थांनी दिली आहे.
विरई मौजा विरई येथील नागरिकांसाठी नळाचे पाणी देण्यासाठी फक्त पन्नास हजार लिटरची टाकी लावण्यात आली परंतु आजच्या स्थितीत विरई गावातील लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढल्याने अर्ध्याही ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरत नाही. करिता अर्धे गाव अजूनही तहानलेलेच आहे. करीता पाणी पुरवठा विभाग प्रशासनाने लोकसंख्येच्या प्रमाणात पाण्याची टाकी देण्याचे करावे अशी मागणी सरपंच प्रदीप वाढई यांनी केली आहे.
चिखली उमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने चिखली येथे होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या नदीमध्ये असलेल्या विहिरी आटल्याने चिखली गावातील टाकीत पाणी पुरवठा होऊ शकत नाही. करिता चिखली वासीय ग्रामस्थ नळाच्या पाण्यापासून तहानलेले आहेत. याकडे ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. तरी जिल्हा प्रशासनाने पाण्यासारख्या गँभीर समशेकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी माजी सरपंच तथा सदस्य लहुजी कडस्कर यांनी केली आहे. अशीच समस्या मौजा गांगलवाडी, डोंगरगाव, मोरवाही या गावात निर्माण झाल्याने मानवासोबत गुरे-ढोरे यांनाही पिण्याच्या पाण्याची झळ पोहचली आहे.
मुलनगर वाढत्या उष्णतेमुळे मुलच्या तलावाचीही पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक वार्डातील विहिरी खोलवर गेल्या आहेत. नगरातील लोक वस्ती वाढत असल्याने वाढलेल्या वस्तीत नळाची पाईप लाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे मूल नगरातीलही अनेक नागरिक नळाच्या पाण्यापासून वंचित आहेत. नगर पालिका प्रशासनाने २४ तास पाणी पुरवठा करणार असे आश्वासन देण्यात आले होते परंतु अजूनही काही वार्डात एकच टाइम नळ सोडल्या जात आहे. करिता २४ तास पाणी पुरवठा होणार असे दिलेले आश्वासन हवेत विरले आहे.
