News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही तालुक्यातील सरडपार वरून लग्नाचे वाहन प्रवासी घेऊन तळोधी ता.नागभिड कडे जात असताना काल गुरुवार रात्रौ 10-30 वाजता चा दरम्यान मेंढा(माल) गावाजवळ टवेरा गाडी नंबर एम एच .-16 एबी- 0364 ही गाडी पलटी झाली होती.
अशी माहिती मिळताच तात्काळ सिंदेवाही पोलीस घटनास्थळी पोहचत सदर गाडी पलटी झाल्यामुळे तिथे असलेल्या प्रवाशांना गाडीमधून पोलिसांनी बाहेर काढले व लगेच जखमींना सामान्य रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल केले. Chandrapur police
सदर चा अपघातात जखमी असलेल्या एका महिलेचे रोख रक्कम व काही दागिने गाडी अपघात झाल्यामुळे खाली पडले अशी माहिती तीने सिंदेवाही पोलिसांना देताच रात्रौ घटनास्थळावर जाऊन शोधाशोध केली व लगेचच सदर महिलेची रोख रक्कम व दागिने स्टेशन मध्ये जमा केले व आज सकाळी त्या महिलेला आपल्या सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये बोलावून ठाणेदार घारे, पिएसआय महल्ले, पोलीस हवालदार बावणे व रहाटे यांनी त्या महिलेला तिचे दागिने व रोख रक्कम स्वाधीन केले. सदर अपघात झालेल्या घटनास्थळावरून दागिने व रोख रक्कम शोधून दिल्यामुळे त्या महिलेने सिंदेवाही पोलिसांचे आभार मानुन व कौतुक केले आहे.