घुघुस - घुघुस शहरातील नकोडा गावातील वर्धा नदीच्या पात्रात आज सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळला.
नागरिकांनी याबाबत घुघुस पोलिसांना सूचना दिली, पोलीस घटनास्थळी दाखल होताच पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर इसमाची अजूनही ओळख पटलेली नाही.
पुढील तपास पोउपनी नीलम डोंगरे, मंगेश निरंजने व सुनील इलमूलवार करीत आहे.
