चंद्रपूर - 24 मे च्या रात्री अष्टभुजा वार्डात धर्मवीर उर्फ डबल्या अशोक यादव या 20 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती.
सकाळी 25 मे ला धर्मवीरचा मृतदेह नागरिकांना आढळला, याबाबत रामनगर पोलिसांना नागरिकांनी माहिती दिली असता गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे व पथकाने तपास सुरू केला असता सकाळी एका आरोपीला ताब्यात घेतले होते.
दुपारच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी मुख्य आरोपी चेतन उर्फ सचिन सोनावणे याला मोरवा विमानतळ परिसरातून ताब्यात घेतले, तर या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथून गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले.
जुन्या वादातून धर्मवीर ची हत्या केल्याची बाब आरोपीनी कबुल केली. Dharmaveer murder
धर्मवीर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी चेतन उर्फ सचिन सोनावणे, 22 वर्षीय स्वप्नील जीवन कातकर रा. अष्टभुजा वार्ड तर तिसरा आरोपी 22 वर्षीय संदीप भाग्यवान सोरते रा. रमाबाई नगर यांना अटक करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेने 1 तर रामनगर गुन्हे शोध पथकाने 2 आरोपींना अटक करीत पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणातील मृतक व आरोपी हे गुन्हेगारी वृत्तीचे असल्याची माहिती मिळाली आहे.
