News 34 Chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- १ मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त अती उष्ण उन्हाळ्यात, भर पावसाळ्यात आणि कडाक्याच्या थंडीत देखील आपल्या जीवाची पर्वा न करता केवळ पोटाच्या भाकरीसाठी व कुटुंबियांच्या उदर निर्वाहासाठी काबाड कष्ठ करणाऱ्या मुल येथील गवंडी काम करणाऱ्या आणि रंगकाम करणाऱ्या कामगारांना उष्णतेची तीव्रता बघुन उन्हाळ्यात उपयोगी व्हावे म्हणून नारळ, दुपट्टा आणि फराळ पॉकेट देऊन सन्मानित करण्यात आले. Maharashtra foundation day
तसेच मुल तालुका आणि मुल शहर कार्यकारिणी नियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र, ओळखपत्र आणि नेफडो चे स्टिकर्स देऊन त्यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रसंगी तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, रत्ना चौधरी नागपूर विभाग अध्यक्षा, ललिता मुस्कावार नागपूर विभाग उपाध्यक्षा, श्रीरंग नागोसे नागपूर विभाग उपाध्यक्ष, कविता मोहुर्ले नागपूर विभाग महिला सचिव, गुरुदास चौधरी नागपूर विभाग सहसचिव, सुषमा कुंटावार चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा, अल्का राजमलवार चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षा, मुल तालुका संघटिका नंदा शेंडे, कल्पना मेश्राम, सुनिता खोब्रागडे,किसन खोब्रागडे सर, नवनियुक्त मुल शहर संघटिका वंदना वाकडे, मंगला बोरकुटे,गिता दिवठे, भ्रांती दहिवले, बबिता शेंडे, सेवानिवृत्त श्री. वाडगुरे सर, सौ.वाडगुरे काकु,तिवाडे सर, वाकडे सर,तिवाडे मॅडम आणि सन्मान मुर्ती अनेक कामगार बंधु आणि भगिनी उपस्थित होते. नेफडो च्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मुल परिसरात अभिनंदन केले जात आहे. Lebour day
