News 34 chandrapur
चंद्रपूर/दुर्गापूर - गेल्या काही महिन्यांपासून उर्जानगर व दुर्गापूर भागात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक दहशतीत जीवन जगत आहे. Cannibal leopardsअनेक नागरिकांचा जीव घेणारा बिबट व वाघ आजही त्या क्षेत्रात वावरत आहे, 16 वर्षीय राज असो की 8 वर्षीय प्रतीक बावणे या दोघांना घराजवळ बिबट्याने हल्ला करीत ठार केले होते. Human-wildlife conflict
मध्यंतरी एका बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले होते मात्र आता पुन्हा नरभक्षक बिबट परत आला असून त्याने 1 मे ला दुर्गापूर वार्ड क्रमांक 3 येथील 45 वर्षीय गीता मेश्राम नामक महिलेला रात्री 12 वाजेदरम्यान घराजवळ बिबट्याने हल्ला करीत ठार केले. Leopard attack
वनविभागाने जेरबंद केलेला बिबट नरभक्षक होता की तो दुसरा होता यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, पुन्हा तो नरभक्षक परत आल्याने नागरिकही घाबरून गेले आहे. Wild animals
वनप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी धीर देत पुन्हा असे हल्ले होणार नाही याबाबत कठोर पाऊले उचलावी लागणार असे सांगितले.
