चंद्रपूर - 2 मे ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास महिला वाहतूक कर्मचाऱ्याला एका वेडसर महिलेने लोखंडी वस्तू फेकून मारल्याने महिला कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली, महिला कर्मचाऱ्याच्या नाकातून रक्तस्राव झाला.
सकाळच्या सुमारास महिला कर्मचारी आपल्या कर्तव्यावर जात मुख्य बस स्थानक पुलावर एका वेडसर महिलेने रस्त्याच्या दिशेने एक लोखंडी वस्तू फेकून मारली मात्र ती वस्तू महिला कर्मचारी ज्योती कांबळे यांच्या चेहऱ्यावर लागली, ज्यामुळे रक्तस्राव सुरू झाला. Chandrapur traffic police
Lady traffic police
दरम्यान प्रियदर्शनी चौकात उपस्थित असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले. ज्योती कांबळे असे महिला पोलीस कर्मचारी चे नाव असून, त्या जटपुरा गेटकडे जात असताना ही घटना घडली. ही वेडसर महिला नेहमीच वाहनावरून जाणाऱ्या लोकांना वस्तू फेकून मारत असते. त्यामुळे दुर्घटना घडत आहेत. सदर वेडसर महिलेची सुरक्षित ठिकाणी रवानगी करावी, अशी मागणी देखील केली जात आहे.
