News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गडचांदूर येथील अनेक लाभार्थ्यांना सन 2018-19 मध्ये घरकुल मंजूर होऊन बांधकामाला सुरूवात ही झाली.सुरूवातीला पहिली व दुसरी किस्त कित्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा सुद्धा झाली.परंतू आजपर्यंत तिसरी किस्त प्राप्त झाली नाही.यामुळे उसनवारी करून अर्धवट घरांची कामे पूर्ण केली. तिसरी किस्त मिळावी यासाठी बरेचदा घरकुल लाभार्थ्यांनी नगरपरिषदेच्या चकरा मराल्या,अनेक निवेदने दिली,मोर्चे काढले तरी सुद्धा नगरपरिषद याकडे लक्ष देत नाही.
Water tax
Water tax
सदर रक्कम खात्यात जमा न झाल्याने यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.अशी परिस्थिती असताना स्थानिक नगरपरिषदेने थकलेल्या नळ व घर टॅक्सवर दोन टक्के व्याज आकारणी करून वसूली सुरू केली आहे.दोन वर्ष कोरोनामुळे व्यापार डबघाईला आल्याने आर्थिक घडी विस्कळली.परिवाराचे पालनपोषण कसं करायचं हा प्रश्न भेडसावत असतानाच काही महिन्यांपूर्वी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी कहरच केला. Property tax थकीत पाणीपट्टी कर,घर टैक्सवर चक्क दोन टक्के व्याज आकारणीचा ठराव मंजूर केला आणि त्याची अंमलबजावणी जोरात सुरू आहे.आता मूळ रकमेसह हा दोन टक्के व्याज भरायचा तरी कसा ? ही समस्या निर्माण झाली आहे.यावर नगरपरिषदेने गंभीरतेने विचार करून नागरिकांच्या हितासाठी समाधानकारक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा असून नागरिकांवर लादण्यात आलेला दोन टक्के व्याज रद्द करावा,घरकुलाची रक्कम लवकरात लवकर खात्यात जमा करावी अन्यथा येत्या 18 मे रोजी नगरपरिषदे समोर ठिय्या आंदोलन आणि 19 मे रोजी आमरण उपोषणचा इशारा त्रस्त घरकुल लाभार्थ्यांनी नगरपरिषदेसह संबंधितांना निवेदनाद्वारे दिला आहे. आता नगरपरिषदेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
